Posts

Showing posts from August, 2026

एकांकिका

एकांकिका ------------  (शेतकऱ्याचा असूड व गुलामगिरी या म. ज्योतिबा फुलेंच्या पुस्तकांवर आधारीत) ------------- (शेतकऱ्याचे घर) दृश्य १  शेतकरी: _[स्वत:शीच]_ हाय रे द्येवा.. पुन्हा रीण काडायची येळ आली. पुन्हा सावकाराचं दारात हुबं राह्यचं न् व्याजात मरायचं.पन काय करनार.. लेकीला उजवली तं पाह्यजेच. बायको : नशीबा फुड कुनाचं काही चालत नाही. ढोरावानी राबायचं लिवलंय लल्लटी तं राबायचं.अग बया ज्योतिबा...या या गुर्जी.. ज्योतिबा : हा धोंडी कां डोक्याला हात लावुन बसलाय?- काय झालं? धोंडी: काय सांगायचं गुर्जी तुमाला..राबराब राबतो दिवस-रात्र. पन पोटाला दोन घास मिळत नाहीत. पीक आलं की निम्मं सावकाराच्या व्याजा पायी जातंय..उरलेलं सरकारी कारकूनाच्या मढ्यावर घालावं लागतंय कसं जगाव मानसानं? ज्योतिबा: आता तूच विचार कर.आपल्यासारखे शेतकरी धान्य पिकवतात म्हणून या देशातली सगळी माणसं पोटभर दोन वेळेला खातात.मग जगाला पोसणारा तुझ्यासारखा शेतकरीच उपाशी कां? शेतकरी:  नशीब..दुसरं काय गुरुजी?- मागल्या जलमीच कर्म ह्या जलमी भोगावं लागतंय ना..बामन साआंगतात नव्हं कां?-आपन शूद्र हौत.भट-सावकारा़ची सेवा करनं आपलं ...

कविता

अनुसरा अथवा सरा- -----------------------  दैवते बाहेर काढा मखरातुनी उत्तरे शोधा जरा प्रश्नातुनी..! अर्चना पूजा पवाडे खूप झाले-  आतला 'माणूस' पहा गाथांतुनी..! वाजवा नंतर नगारे ढोल-ताशे- मुक्त होऊया या चला व्यसनातुनी..! वाजली टाळी कधी कां एकहाती? हीण द्या फेकून डाव्या-उजव्यातुनी..! आपुले नेतृत्व आता आपण करु-  जिंकूया दाही दिशा..संघर्षातुनी..!! शब्दक्रीडेने मिळाला मार्ग-मध्यम  अनुसरा अथवा सरा..मार्गातुनी..!!! * रमेश यशवंत वाकनीस  ९ आठ २०२६  भटकबोल्या : ९०९६८००६५३