सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून.. माणसानी साठी ओलांडली नं की खूप मजा मजा होते.मात्र त्याच्या पेक्षा तरुण असलेल्यांना ही मजा वाटत नाही.त्यांना सजाच वाटते ती.अपवाद असतील पण सर्वसाधारणपणे असं अनुभवास येतं खरं.परवा एक आजीबाई सांगत होत्या..'अहो,चहा करण्यासाठी म्हणून गॅस पेटवायला गेले तर माझा मुलगा इतका संतापला म्हणून सांगू..' मी विचारलं काय झालं असं?..तर म्हणाल्या,' अहो,जो बर्नर पेटवायचा त्याच बर्नरचं बटण आॅन करायला पाहिजे ना मी?..मी आपली मधल्या बर्नरचं बटण आॅन करुन कडेच्या बर्नरला काडी लावतीय..' तेवढ्यात तिथे मुलगा आला आणि इतका तोडून बोलला..' एवढी कशी शेण खायला जाते तुझी बुध्दी? तुला द्यायचा नसेल चहा तर देऊ नकोस ना..पण असले उद्योग करु नकोस.माझं लक्ष गेलं म्हणून बरं झालं नाहीतर सगळ्या घराला काडी लागली असती..!!' मग म्हटलं,' चुकलं बाबा नाही आलं लक्षात माझ्या.माफ कर..' आता एवढं म्हटल्यावर मुलानं समजून घ्यावं ना..पण तो तस्सा तणतणत आॅफिसला निघून गेला म्हणे..! आजीबाई नंतर स्वत:लाच बोल लावत रडत राहिल्या.एवढं वय झालेल्या माणसांकडून चूक होतेच कशी? असं एखाद्या मुलाला-मुलीला वाटलं त...