२१ गाव
दे दान सुटे गिरान म्हणत
फिर गावभर..
लाज सोडून जिरव खाज
हास वरती तोंडभर..
उघड्यानागड्या घरट्यांमधून
नर चढतायत मादीवर..
तुझ्या सारखी पोरे अरे रोजच
येतायत रस्त्यावर..
बघतोस काय डोळे खूपसून
अंधार टाक पाठीवर..
गांड मारुन गेलाय प्रभोऽऽ
तुझी भिस्त तुझ्यावर..
पोटासाठी पसर हात लाथा
झेल कुल्ल्यावर..
उगाच मुठी आवळू नकोस
मानभंग झाल्यावर..
आला आहेस जगण्यासाठी
लक्षात ठेव मातीवर..
राख सुध्दा आपली नसते
थांबलास काय घाटावर..
जा राजाऽ जगता जगता रोज
एकदा मेल्यावर..
आनंदाचा लेप असाच
थापित जा रेऽ चेहऱ्यावर..
दे दान सुटे गिराऽऽन गावच
फिरतय गावभर...!!!
..
Comments
Post a Comment