३६ क्षण
हिरव्यात उभे असताना
हळूहळू गारवा येतो
हासून सुगंधा नेतो अन्
श्वास खरा हा होतो..!
उमलत्या कळ्यांच्या संगे
निर्माल्य होऊन जातो
आजचे कालचे सारे मी
श्वास तुला कां देतो?..
मोहाच्या नव्या क्षणाला
मी जिवंत इतुका होतो-
जगणारा हजार वर्षे-
लाजेने मोडुन पडतो..!!!
Comments
Post a Comment