३२ होळी
बोंबलू नका चव्हाट्यावर
होळी असली म्हणून काय झाले?
गोळी लागून सांगा बरे-
'गोरे साहेब' किती मेले?..
नुसती लाकडे पेटून उठली-
म्हणून काय झाले?..
सांगा बरे ह्रदयात नंदादीप
किती उजळले?..
होळी पेटली विझून गेली
मेला म्हणून बोंब झाली...
धुळवड खेळण्या आधी जरा
दाखवा पाहू लंगडा माधव...
Comments
Post a Comment