२० जाग
झोपेत कोणी येऊन गेले
आठवून बघता इतुके कळाले
देणे कधीचे मागून गेले ..!
उघडून दारे जवळी बसून
हिशोब सारा मज दाखवून
उसने दिलेले दे रे म्हणून
देणे कधीचे मागून गेले..!
आप्तेष्ट नाही मजला अनोखे
वाटे तरी कां सारेच नवखे
स्मरता उरीचे चुकतात ठोके
देणेच होते घेवून गेले..!
स्वप्नी दिलेले दे रे म्हणून
राजाधिराजा भिकारी करुन
परिक्षा बघितली म्हणते हसून
झोपेत आले गेले वदून..!
घरदार सारे आहे कशाला?
मन देह बुदी त्याच्या पुजेला
मेल्यावरी राख त्याच्या तृषेला..!
उसने दिलेले न देताच गेला
सांगा असा कोण जगतात आला?
झोपा तुम्ही...ते जागेच आहे..!!
Comments
Post a Comment