२९ धन्य

खुर्ची नि टेबल काहीही खपेल
कपाळी लेबल येथे थुंका
सांगाल तेथला कागद हालवू
ताकद दाखवू लाचारीची
वाट्टेल त्या तिथे वाट्टेल ते खाऊ
वाट्टेल ते लेऊ आनंदाने
जपू जिवापाड ऐसे ब्रीदवाक्य
अशक्य ते शक्य करावया
रांडेहून थोर येथला व्यवहार
पगारही वर बक्षिसीही
कोणतीही'शाही'अण्यागिनिवारी
मोडीत काढतो हमखास
नसू द्या किताब आम्ही ते नबाब
चोदवू रुबाब सर्वठायी
मालकही धन्य चालकही धन्य
आम्ही अहंमन्य कर्मचारी

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७