१९ मोळी

टाकून द्या हो मोळी आता
पाण्यात पहात बसू नका
मरण समोर आले म्हणून
जन्मावरती रुसू नका.
घुमतो आहे आत बाहेर
फुटका घडा जोडू नका
सारे सोडलेत ज्याच्यासाठी
त्याला आता सोडू नका.
आज आहात उद्याच्या
भरवशावर राहू नका
कालच्या सारखा ' आज '
स्वप्नातही आणू नका.
निराश व्हा वैफल्याची
फळे उगाच तोडू नका
ताठ उभे राहून असे
वारंवार मोडू नका.

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७