४२ धागे

तटातटा तुटोनी गेले
विणताच जिवाचे धागे
गऽ शिणलो आता सखये
मी कशास पाहू‌ मागे?..||ध्रु||
लक्तरे टांगुनी आता मी
वेशी वरती गावे..
गावातुन वस्त्त्रासाठी कां
दारोदार फिरावे?..
डोळ्यातुन कां गऽवेड्या
अश्रूंची झड ही लागे..||१||
उतरंड लागली असता
कां डोंगर माथा पाहू?..
भरणाऱ्या नाही जखमा
या अशाच दे ना वाहू..
पडझड ही आता मजला
सवयीची झाली ना गे?..||२||
होत्याचे नव्हते झाले‌
आयुष्य राहिले नाही..
सत्याहुन सुंदर कुठले
मी स्वप्न पाहिले‌ नाही..
सरणावर अजुनी माझे
हे भूत कशाला जागे?..||३||
गऽ शिणलो आता सखये
मी कशास पाहू मागे?...

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७