१४ वाट

संध्याकाळ झाली सखे..
पाखरे उडून चालली...
उमरभर स्वप्नं बघितली..
ती ही निघून चालली..!
भेटलो कां?..बोललो कां?
अश्रू ढाळावे कशाला?..
कोण आहे आपले इथे..
नाती तुटून चालली..!!
काय केले?काय मिळवले?
आलो कशासाठी इथे?..
चाललो आहोत आभासात
यात्रा कुठे चालली?..!!!
भले काय,बुरे काय? समजले,
समजलो नाही कधी..
खरा आहे पशू .आतली -
माणसे छळून चालली..!!!
उमरभर स्वप्नं बघितली..
ती ही निघून चालली..
साऱ्याच वाटांची ही वाट
अंधारात बुडून चालली..!!!

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७