३३ चौकट
शीळ घालुनी मारुन डोळे
निघून गेले..
चौकटीतले नटवे डोळे
रुसून गेले..!
आज असे कां कुणीच येथे
फिरकत नाही..!
रात चांदणे पसरुन आहे
बरकत नाही..!
कुठे कुणाची माया अडते कुठे
कुणाचे मोह..
परंतू येथे पोटा मधले पेटुन
उठती दाह..!
कशी मिळाली वस्ती हिजला कशी
मिळाली मुक्ती..
जगण्यासाठी चौकट आली आणि
जाहली सस्ती..!!!
Comments
Post a Comment