३९ अंत
थांब थोडी जायची ही
वेळ नाही..
मेळ आहे दो जिवांचा
खेळ नाही..
अर्थ आहे जागृतीला
तोवरी घे..
झोप माझी कूड ही
सर्वस्व नाही..
स्पर्श आहे जीवनाचा
भास नाही..
जन्म नाही मृत्यूचाही
फास नाही..
मीलनाच्या या सुखाला
अंत नाही..
व्यर्थ आता थांबणेही
ठिक नाही...
Comments
Post a Comment