१५ वसंत


या एकाकी अंधारात
भिक्षेचे पात्र होऊन‌ बसू नकोस..
ठाऊक आहेत अपराध मला
कळ्यांचे आणि फुलांचे सुध्दा..
पण हे निरपराध मुला,
तुझ्यासाठीच आलेल्या या वसंताला..हृदयातून कायमचे हद्दपार करु नकोस..
मिळवावे लागते प्रेम तिचे..
मागून मिळत नाही..
देणाऱ्याचे हात घेतलेस आता
लाख दिले तरी घेऊ नकोस..
या एकाकी अंधारात
भिक्षेचे पात्र होऊन बसू नकोस.

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७