धून

रंग बावरेसे ऊन
माझ्या गळ्यातली धून
नव्या गीतासवे ऋण
वाहे माती-पाण्यातून

स्नेह पाझरु नजर
आहे आनंदात चूर
वाढे कासवीचे पिलू
असे राहूनिया दूर

असो भले-बुरे जग
आता जगायचे आहे
नीत आनंद ह्रदय
इथे लुटायचे आहे

म्हणे कासवी पिलाला
जा रेऽ सावकाश बाळा
ठेव ज्ञानियाचा चाळा
मागे टाकशील काळा..

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७