३७ गौळण
हिरवी पिवळी गौळण
चाले ठुमकत ठुमकत वाटेत
भाळावरच्या कुंकुम तिलका
धनी हासतो तोऱ्यात..
कुठे चालली पुसता म्हणते
काय करावे तुम्हास-
गौळण मी हो घड्यात माझ्या
दह्या दुधाची बरसात..
दूरदूरचा कोकीळ तिजला
उगाच पाहे घुश्शात
वाट बिचारी गढून आहे
गाणे ठेवुन कंठात..
Comments
Post a Comment