४१प्रवास
.रिक्त हस्त आला जो तो
रिक्त हस्त जातो..
सोडुनी प्रवासी कुठल्या
प्रवासास जातो..||ध्रु||
भोवती तमाच्या दाही
दिशा हासताती..
पाय पुढे पडती मागे
भुते लागताती..
कुणाला कशा या वाटा
गाठती पहातो..||१||
निळ्या सावलीला आहे
अपाराचा पार..
दु:खभोग कोणासाठी
सौख्य अनिवार..
घडायचे घडते आहे कोण
रोधू शकतो..||२||
मरण सोबतीला आहे
इथे जन्म-जात..
दोन किरण बघण्यासाठी
दीर्घ काळरात..
शोध अगम्याचा घेता
अगम्यची होतो..||३||
©रमेश यशवंत वाकनीस©
४/१०/१९७६
Comments
Post a Comment