उरून राहते आहेस
११
साऱ्या चुका पोटात घातल्यास
अजूनही घालते आहेस
धरला हात झिडकारुन
पुन्हा जवळ घेते आहेस
कां ग अशी करते आहेस?
मला भरुन सरते आहेस
पुन्हा उरुन राहते आहेस
वेड लावून जाते आहेस
पुन्हा चूक होते आहे-
धुतला तांदुळ धुतल्याविना
स्वच्छ झाला म्हणतो आहे
स्तुती वाचुन फुलतो आहे
गाभाऱ्यातून हाकललेला
देव मला बघतो आहे
पाय धरुन बसलो आहे
कां ग अशी हसते आहेस?
Comments
Post a Comment