काय मी करावा जनांचा उध्दार जाहलो गद्दार पांडुरंगा. सुखासाठी माझ्या हपापलो किती सोडली मी नीती पांडुरंगा. त्वचेपरी साऱ्या दोषा चिकटलो कशाला हा घोषा पांडुरंगा.
मी रविंद्रनाथांची पत्नी ५. माझे रवि ठाकुर शरद ऋतुतल्या आकाशासारखे आहेत.कधी भरुन आलेल्या मेघासारखे.तर कधी उन्हाप्रमाणे शुभ्र.कधी अल्लड चंट मूल.कधी प्रौढ, धीर..गंभीर..! त्यावेळी आम्ही जोडासांकोच्या ठाकुरवाडीतच होतो.ते दक्षिणेच्या व्हरांड्यात एका आरामखुर्चीत बसले होते.मी खाली फर्शीवर बसले होते,त्यांच्या पायाशी. मी त्यावेळी काही महिन्यांची पोटुशी होते.ते खूपच मौज-मजेच्या मूड मध्ये होते.त्यांचा पूर्ण दिवस लेखनकामाठीत गेला होता.संध्याकाळी काय झालं कोण जाणे एकदम व्हरांड्यात येऊन बसले,म्हणाले- " तू ती मैद्याची खूप पदर असलेली मिठाई बनवली होतीस मला खूप आवडते ती.तिचं नांव काय? " " ऐलोझोलो ! " कधी खायचीय सांगा बनवते.." " ऐलो झोलो?" इतक्या सुंदर मिठाईचं इतकं वाईट नांव? " " तुम्ही सुचवा दुसरं एखादं नांव..तेच नांव कायम करु.." " क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले " परिबंध " " परिबंध?-काय म्हणायचा याचा अर्थ? " किंचित हसून ते म्हणाले, केस बांधून जेंव्हा नोतुन बोऊठान समोर येऊन उभी राहिली तेंव्हा तिला एकदा म्हटलं होतं- " क...
मी रविंद्रनाथांची पत्नी ------------------------------ ७. नोतुन बोऊठान आणि माझ्या नवऱ्याने गच्चीवर जे नंदनकानन फुलवलंय त्याचं एक गूढतर स्वरुप आहे. ती केवळ एक बाग नाही.त्या दोघांच्या प्रेम-संबंधाची ती स्मृती आहे.त्याच फुलबागेत त्यांनी आपल्या सुप्त प्रेमाची कबूली दिली होती.प्रेम कां कधी लपून राहतं?- नाही लपवता येत.हे माझ्या नवऱ्याचंच म्हणणं आहे.गोड गुपितांची मनभाषा डोळ्यातून व्यक्त होते..! एक दिवस तेच मला म्हणाले - " आपल्या अनेक कवितातून आणि गीतातून मी माझी मूक प्रेमकहाणी सांगितलीय.प्रेमाच्या गूजगोष्टी लपवून ठेवताच येत नाहीत छोट्या सूनबाई.." - तर मी सांगत होते गच्चीवर फुलवलेल्या नंदनकाननात दोघांचे संबंध अधिकाधिक प्रगाढ झाले.संध्याकाळ होताच नोतुन बोऊठान न्हाऊन केस बांधून आपल्या प्रिय ठाकुरपो बरोबर गच्चीवर जायची.नोतुन बोऊठान चांदीच्या तबकात ओल्या रुमालात मोगऱ्याच्या फुलांची माळ ठेवायची.आपल्या अधरांना रंगवण्यासाठी सुगंधित पान ठेवायची.माझ्या नवऱ्यानेच सांगितलं होतं- " केवळ नोतुन बोऊठानला ऐकवण्यासाठी मी नवी नवी गाणी लिहायचो.माझ्या हृदयात जणू प्रेमाचा पूर आला होता.नंदनका...
Comments
Post a Comment