३१ सुंदर

आधीचे जर दिवस धुक्याचे
तर नंतरचे कुठले?
नंतरचे जर दिवस उन्हाचे
तर आधीचे कुठले?..
आधी होते लाल कबूतर
नंतर झाले काळे
आता होईल शुभ्र धवल
नि क्षणात होईल पिवळे..!
वाळू मधले शंख शिंपले
चमचमणारे तारे
तुटून पडले खोल तळी
तर कसे म्हणावे चुकले?
शिगोशीग हे भरुन सांडले
रुप-रसाचे प्याले
अनंत रुपा मधून घ्यावे
ह्रदयी झेलुन कुठले?
अमूर्त ते ते मूर्त रुपाने
सृष्टी मधूनी न्हाते
रुप स्वत:ला देता देता
खऱ्या रुपाला मुकले..!
आधीचे कां धुके म्हणावे
अन् नंतरचे ऊन
आहे, होते,सुंदर राहिल
जीवन मरणाहून..!

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७