२५ मध्यान्ह होत असताना
कवटीच्या मध्यभागी सूर्य उगवताना
मी पहात असतो हिरव्यागार
झाडांचे स्तूप थंडपणे
उभे असलेले..
वारुळात मुंग्या जमा होऊ
लागलेल्या असतात एखाद्या
झुरळाचे प्रेत घेऊन
सर्वांगातून उष्ण पाण्याचे झरे
वाहू लागतात..अशा वेळी..
तुझ्या येण्याची अपेक्षा
फुटते लालसपणे..
आणि
मध्यान्ह होत असताना
मी परत कवटीत स्थानापन्न
हज्जार डोळ्यांचा पंखा मिटून-
शांत शांत शांत,
Comments
Post a Comment