३४ थाळी

ऐन दुपारी झर् झर् बरसत
श्रावण बरखा झाली
रवी हासुनी पहात दडला
कुठल्या मेघा खाली?..||ध्रु||
हरित मनोहर समोर सुंदर
ही झुडपांची राई..
मधे धावती नदी कडेने गुरे-
वासरे घाई..
टच्च सावळे मेघ जांभळे
फुटून हसले गाली..||१||
थंड झोंबरे पिऊन वारे झाडे
घुसळीत अंगे..
कुठे चालले पक्षी म्हणती जाऊ
यांच्या संगे..
पुन्हा वाकुनी रवी ओढतो नव्या
ढगांच्या शाली..||२||
चराचरातुन कुणी फुलविले
चैतन्याचे मेळे..
हे आदिचे रुप पाहुनी दिपून
गेले डोळे..
बघता बघता रवी वाजवे
अंधाराची थाळी..||३||

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७