२२ गीत

धुंद आहे वादळाची रात्र
माझ्या भोवती
हे क्षणाचे जन्म आणि
मी क्षणाचा सोबती ||ध्रु||
शांततेचे पान कोरे
गळुन पडते सारखे
गार हिरवे झाड होते
सावलीला पारखे
काल होते जे फुलांचे
ते फुलांनी नाहती ||१||
दोन होते जीव त्यांची
एक उल्का जाहली
खोल आता या तमातुन
ही असोशी राहिली
आज आलो अन् उद्याचा
ना भरोसा सांगती ||२||
नीज यावी या विजांना
दूर कोणी प्रार्थितो
वादळांना पांघरोनी एकटा
मी झोपतो
मी क्षणाचा सोबती पण
ही युगांची सोबती ||३||
धुंद आहे वादळाची
रात्र माझ्या भोवती..

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७