२३ यंत्र
यंत्र
-------
ढीगभर दु:खे विणारे यंत्र आले
अन् घरट्यात साऱ्या गात आले..
आंदणे देऊन गेले बापजादे-
शेत हे खाऊन कु़ंपण मस्त झाले..
जे मिळाले तेच खावे रोज प्यावे
फुंकण्या येथे उकिरडे मोप झाले..
शौर्य मी माझेच आता काय सांगू
भोगण्या सारी सुखे हे क्रौर्य आले..
प्रेमही विसरुन गेलो व्यायली कां?
रोधण्या माता कुणाची अश्रू ढाळे..!
ढीगभर दु:खे विणारे यंत्र आले.
*
©रमेश यशवंत वाकनीस
Comments
Post a Comment