सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून..
------------------------
तसं पहायला गेलं तर या जीवनाला एका शून्याची जांभई या पलिकडे अर्थ नाही.तरी पण आपण ते अर्थपूर्ण आहे असं समजून जगतोय हे लक्षात येतं तेंव्हा निरर्थाला अर्थ देण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करतो.जन्म आणि मृत्यूच्या या मधल्या प्रवासात आपण जे जे काही करतो ते सगळं या प्रयत्नाचाच भाग असतो.या प्रवासात दरवेळेला नित्य नवे काही कळत जाते.हे 'कळणे' वळायला लागते तेंव्हा आपणही जीवना इतकेच ताजे टवटवीत होतो.विश्वाच्या या अगम्य,अगाध पसाऱ्यातील आपला जन्म म्हणजे शांत जलाशयावर पडलेला‌ खडा. आपण जन्म घेतो एक अगदी छोटे वर्तुळ तयार होते.ह्या छोट्या वर्तुळातून मोठे,अधिक मोठे,अधिक मोठे,वर्तुळ तयार होते..इतके की त्याला कुठला परिघही रहात नाही.अर्थ शोधता शोधता परम- अर्थच होऊन उरणं.असणं.हाच परमार्थ.पूर्ण ज्ञान प्राप्ति नंतरची असीम शांत अवस्था.हा अनुभव प्रत्येकालाच येऊ शकतो.अट फक्त एवढीच की आपले प्रत्येक कर्म अत्यंतिक सजगतेने व पूर्ण निष्ठेने करणे.

हे जीवन वेड्या अर्थशून्य जर नसते 

शब्दात कवींनी काय मांडले असते? 

एकाच दिशेने ओढित गाडा गेलो..

ना भिंती..वाडा चौसोपी बांधित बसलो..!! 
©रमेश यशवंत वाकनीस©

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७