गझल
तयारी
--------
जीवन म्हणजे मरावयाची
करा तयारी..
काळ वेळ ही निश्चित ठरली
करा तयारी..
स्वप्ने कांक्षा आशा म्हणते
धावा धावा..
इथले सारे.. इथेच राहील
करा तयारी..
उगा शहाणपण शिकवू नाही
इथे कुणाला..
आपुले ओझे आपण उचला
करा तयारी..
'आहे-आहे' 'नाही-नाही' वाद
कशाला?
मौन सागरी घ्याया डुबकी
करा तयारी..
राखे मधल्या अस्थी झाल्यावर
गंगार्पण..
जन्मजन्मीची यात्रा सरण्या
करा तयारी...
©रमेश यशवंत वाकनीस
Comments
Post a Comment