कविता
अनुसरा अथवा सरा-
-----------------------
दैवते बाहेर काढा मखरातुनी
उत्तरे शोधा जरा प्रश्नातुनी..!
अर्चना पूजा पवाडे खूप झाले-
आतला 'माणूस' पहा गाथांतुनी..!
वाजवा नंतर नगारे ढोल-ताशे-
मुक्त होऊया या चला व्यसनातुनी..!
वाजली टाळी कधी कां एकहाती?
हीण द्या फेकून डाव्या-उजव्यातुनी..!
आपुले नेतृत्व आता आपण करु-
जिंकूया दाही दिशा..संघर्षातुनी..!!
शब्दक्रीडेने मिळाला मार्ग-मध्यम
अनुसरा अथवा सरा..मार्गातुनी..!!!
*
रमेश यशवंत वाकनीस
९ आठ २०२६
भटकबोल्या : ९०९६८००६५३
Comments
Post a Comment