माझा परिचय

माझा परिचय 
---------------
संपूर्ण नांव : रमेश यशवंत वाकनीस 
पत्ता : कामायनी सह.गृह.संस्था,पेठ २५ घरांक ५०/२ 
शिक्षण : एस एस सी(पुणे,ग्वाल्हेर,फलटण,विशाखापटणम अशा विविध ठिकाणी)
व्यवसाय : संरक्षण खात्यातून सेवानिवृत्त 
काव्य-नाट्य-साहित्य क्षेत्र 
---------------------------
कविता संग्रह 
-------------- 
'पूर' ( श्रीशब्द प्रकाशन १९८६ ) 
'चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..!(हर्षदा प्रकाशन२००३) 
'पिवळा चाफा हिरवे पान'(संवेदना प्रकाशन)
आकाशा आणि काही कविता (इ-संग्रह) 
'ओळखावा धोंडा अंतरीचा'(मैथिली प्रकाशन)
दीर्घ नाटक : 'कहाणी अखेरच्या संपाची'(परेश एजन्सी) 
खेळा खेळात व इतर नाटके : (परेश एजन्सी)
धम्मपद : जसे आहे तसे ( *मूळ पाली धर्मग्रंथाचा मराठी काव्यानुवाद इ- बुक प्रकाशित)
*
बुद्ध जीवन दर्शनावरील कादंबरी 
'आदि मंगल..मध्य मंगल..' 
'चपराक'दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रकाशित.
------------------------------------- 
नाट्यक्षेत्र 
----------- 
'भस्मासूर' या व्यावसायिक बालनाट्याची निर्मिती,दिग्दर्शन(१९७०-१९७३ या काळात एकूण २५ प्रयोग) 
दूरितांचे तिमिर जावो : भूमिका :दिगू 
प्रेमा तुझा रंग कसा : भूमिका :बाजा 
सं.देवमाणूस :(भूमिका:सुहास)
काका किशाचा : (दिग्दर्शन व भूमिका :सुमन मुंगी 
*(वरील सर्व प्रयोग महाराष्ट्र मंडळ,विशाखापट्टणम येथे झाले.'काका किशाचा' या नाटकाच्या प्रयोग महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केला होता.मंडळाकडून मुख्यमंत्री निधीला १,५०,०००/₹ देणगी देता आली) 
दिग्दर्शन : बाबा हरवले आहेत (लेखक: विजय तेंडुलकर) 
नाटक : 'पूल' भूमिका : वकील व हवालदार लेखक : विजय कुवळेकर : दिग्दर्शक : सुरेश कोकीळ 
नाटक : द फादर भूमिका : वडिल लेखक : कृ.रा.सावंत 
(वरील दोन्ही नाटके कामगार कल्याण केंद्र,कसबापेठ तर्फे झाली)
लेखन/ दिग्दर्शन : 
१.खेळा खेळात २.कश्शी खोड मोडली
३.बस स्टाॅप 
(वरील तीन बालनाटिकांचे प्रयोग आकुर्डी चिंचवड इंग्लीश मिडीयम स्कूल मधील नाट्यशिबिराच्या निमित्ताने शाळेचे स्नेहसंमेलन व कामगार बालनाट्य स्पर्धेत झाले) 
*ए.सी.ई.एम.स्कूल मधे मानद सांस्कृतिक शिक्षक म्हणून दहा वर्षे काम केले. 
*
या शिवाय
------------
'शब्दगंध'निर्मित श्री अथर्वशीर्षांजली ही मराठी काव्यानुवादाची ध्वनिफित ३५ वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती.संगीतकार मधु जोशी गायक : पद्मश्री.रविंद्र घांगुर्डे,वंदना घांगुर्डे.सध्या ही अथर्वशीर्षांजली यूट्यूबवर गाजते आहे.
'गहिवर स्वरगंधाचा' संगीत : राहुल घोरपडे गायक : रविंद्रसाठे,किशोर कुलकर्णी व इतर.हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम १९९२ साली‌संपन्न झाला.यातील माझे ' जाईजुईच्या श्वासात फुलतं' हे गाणे राधा मंगेशकर यांच्या आवाजात यूट्यूबर गाजते आहे.या कार्यक्रमाची सी.डी.प्रकाशित आहे.
------
पडद्यावरील कामगिरी
------------------------ 
'इन सर्च आफ ह्यूमन डिग्निटी' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुष्ठरोग निर्मूलनावरील अनुबोधपटात महत्वपूर्ण भूमिका :(चापेकर)
रिटायर्ड डे (शाॅर्ट फिल्म) 
'सेलिब्रेशन (शाॅर्ट फिल्म)
'काश'(हिंदी शाॅर्ट फिल्म) 
'विघ्नहर्ता'(वेबसीरीज रमाशंकर फिल्मस)
----------------------------------------
पत्रकारीता 
------------ 
उपसंपादक:साप्ता.चिंचवड दिनांक (संपादक :मधु जोशी)
उपसंपादक दै.कानोसा (संपादक :आर.एस.कुमार) 
बातमीदार:पिंपरी-चिंचवड टू डे(संपादक: गोविंद कुलकर्णी)
बातमीदार:(पिंपरी-चिंचवड समाचार,संपादक विजय अंबाडे)
उपसंपादक: दै.राष्ट्रतेज(संपादक : अमरसिंह जाधवराव) 
छांदसी : या वाड़मयीन नियतकालिकाचे यशस्वीपणे संपादन व प्रकाशन१९८३ ते १९९३ 
------------------------------------ 
संस्थात्मक कार्य 
सचिव :शब्दगंध साहित्य कला सहयोग(१९८१ ते १९९१) 
सल्लागार :नवयुग साहित्य व शैक्षणिक संस्था,निगडी,पुणे 
माजी अध्यक्ष :समरसता साहित्य परिषद,चिंचवड शाखा 
*
संस्थापक अध्यक्ष :'रुद्रंग' निगडी,पुणे 
या संस्थेतर्फे गेली अकरा वर्षे मराठीतील उत्तम साहित्यकृती अभिवाचन कलेच्या माध्यमातून रसिकां पर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.
*
या सर्व प्रवासात विविध संस्थांच्या बालनाट्य स्पर्धा,काव्य स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,अभिवाचन स्पर्धांचा एकांकिका स्पर्धांचा परिक्षक म्हणूनही सेवा करता आली.

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७