कविता

रंगत
------
सोबत नाही संगत नाही
जीवनात या रंगत नाही..!
विश्वासाला चूड लागली
पण नेकी ही भंगत नाही..!
चलनीनाणे नाही जवळी
मग बाजारी किंमत नाही..!
नाचविल्याविण बाया येथे
उत्सवात या गंमत नाही..!
लोकांताचे क्षणभंगुर सुख
एकांताला दंशत नाही..!!
©रमेश यशवंत वाकनीस
२०/८/२०२५

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७