धम्मपद निरुपणमाला

 प्रारंभ 
 --------- 
जिज्ञासू मित्रांनो.. 
धम्मपद :निरुपणमालेचा आस्वाद घेण्यापूर्वी 'धम्मपद' या अध्यात्मिक ग्रंथाचा थोडक्यात परिचय आपल्या सर्वांना करुन देणे आवश्यक वाटते.'धम्मपद' हा बौद्धधम्म साधकांचा अत्यंत प्रिय ग्रंथ आहे.बुद्धत्व प्राप्तीनंतर आयुष्यभर बुद्धाने अगणित शिष्य आपल्या ओजस्वी वाणीने घडवले.अंतर्मुख होऊन माणूस म्हणून उत्साहाने व सन्मानाने कसे जगायचे शिकवले.पुढे त्याच्या महानिर्वाणानंतर त्याच्या अनेक शिष्यांनी बुद्धाची ही  विखुरलेली वाणी संग्रहीत केली.हे कार्य अनेक शतके चालले.ही  विखुरलेली वाणी म्हणजेच 'धम्मपद'.बुद्धत्व प्राप्त करुन घेण्यासाठी पूजाअर्चादी कर्मकांडांची नाही तर ध्यानाची गरज आहे.ध्यानाशिवाय ज्ञान नाही.साहस नाही.ध्यान  साधायचे असेल तर धम्मपदांचे चिंतन मनन आवश्यक आहे.बुद्धाने दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे.
'धम्मपद' हा ग्रंथ पाली भाषेत आहे.यात एकूण २६ वग्ग म्हणजे अध्याय आहेत.प्रत्येक अध्यात २०/२१ पदे आहेत. निरुपण वाचण्यापूर्वी मूळ पाली पदे व लगेच पुढे त्याचा मी केलेला  सुलभ मराठी काव्यानुवाद वाचाल असा विश्वास वाटतो.ही पदे  कोणत्या प्रसंगी, कुणाला, कुठे, सांगितली याच्या अट्ठकथा (अर्थकथा) आहेत.निरुपणमालेत या अट्ठकथा मी घेतलेल्या नाहीत.दर रविवारी दोन अध्यायावरील सारांश रूपाने निरुपण लिहीणार आहे.प्रत्येक पदावर वेगळे लिहीलेले नाही. कारण  विस्तारभय. चला तर मग वाचा आणि आपला मनमोकळा अभिप्राय नोंदवा..

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७