नाही नाही


नाही नाही
----------- 
रंग रूप गंधे|सुखावतो जगा 
ऐसा अहं फुला|नाही नाही 
सावली धरून वृक्ष उभे तरी 
उपकारभाव|नाही नाही 
चंद्रसूर्य नित्य| प्रकाशती नभी 
गर्व याचा तया| नाही नाही 
नद्या सागराला| भेटाया वाहती 
तृष्णा शमविण्या|नाही नाही  
सृष्टीचे चालले|नृत्य अविरत 
हेतू त्यात दूजा|नाही नाही 
अद्भूत प्रेमाचा|दिव्य आविष्कार 
व्यक्त तरी व्यक्त|नाही नाही 
©रमेश यशवंत 
 
 



Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७