भक्तीगीत
भक्तीगीत
-----------
गाऊ नाचू आनंदाने
विठ्ठलाच्या गजरात
विसरुन देहभान
विसरुन दिन-रात |ध्रु|
विठू आमुचा आधार
त्याच्या प्रेमा नाही पार
त्याच्या चरणी ठेविला
सारा संसार असार..
होती कंटकांची फुले
त्याच्या नामाने मार्गात |१|
जातीपाती अंधश्रद्धा
आम्ही तोडत चाललो..
लळा माणूसधर्माचा
जगा लावित चाललो..
विठू आमुचा कैवारी
आम्ही नाही कुणा भीत |२|
ब्रीद आमुचे विठ्ठल
ध्येय आमुचे विठ्ठल..
प्रेय श्रेयही विठ्ठल
निजधामही विठ्ठल..
विठो आमुचा कैवारी
आम्हा ठेवितो सुखात |३|
जन्म मरणाचे चक्र
विठू फिरवितो नीट..
त्याची कृपाच दावते
मोक्ष-मुक्तीची पहाट..
भेटू उराउरी त्याला
न्हाऊ प्रेमाच्याधारात |४|
©रमेश यशवंत
९ जून २०२४
Comments
Post a Comment