गझल
कंठात तीच गाणी
--------------------
जो एकटा जगाला होता पुरून उरला
त्याचाच हात माझ्या पाठीवरुन फिरला
होता सदैव त्याच्या मस्तीत तो कलंदर
पडला अनेकदा पण सावरून उठला
काटे असंख्य होते मार्गात पेरलेले ..
वेचून ते फुलांना तो अंथरून हसला
समिधा पडावयाची यज्ञात थोरवीची
ती एक धुंद ज्वाला तो पांघरून नमला
शमली तहान नाही त्याची जगावयाची
कंठात तीच गाणी माझ्या भरून तरला
©रमेश यशवंत
Comments
Post a Comment