साठवणीतल्या आठवणी

सुस्वागतम..! सुस्वागतम..! 
नमस्कार..मी स्मिता कुलकर्णी रुद्रंग प्रस्तुत 'साठवणीतल्या आठवणी' या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांचं मन:पूर्वक स्वागत करते...
'जाता जाता गेला फाल्गुन सरून,चैत्रातले ऊन उतरले..पाण्यापास रंग नुरले वेगळे..फक्त ते हासले तान्ह्या परी..वाटे वाटे जीवा दृष्टीचा पाडवा,आज करू यावा आसमंती..
नुक्ताच आपण सर्वांनी चैत्री पाडवा उत्साहानं साजरा केला..त्याचा आनंद ओसरत नाही तोवरच राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या उत्सवात आपण सर्व न्हाऊन निघालो..तेंव्हा नव संवत्सराच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..! 
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे,पीसीबी न्यूज चॅनलचे संपादक अविनाशजी चिलेकर आणि ज्यांच्या साठवणीतल्या आठवणी आपण ऐकणार आहोत ते मधु जोशी इथे उपस्थित झाले आहेत.कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनानं करणार आहोत तिनही मान्यवरांना मी विनंती करते..रुद्रंगच्या रमेश वाकनीस आणि आडावदकर सरांनीही यायचं आहे..
रंगदेवतेचे आशीर्वाद घेतले  अतिथी देवो भव..! मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत.गिरीशजींचा सन्मान रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांनी करावा..गिरीशजींनी अविनाशजी चिलेकर यांचा सन्मान करावा आणि मधु जोशी यांचा सन्मान रमेश वाकनीस यांनी करावा..
प्रथे प्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल मी माधुरी ओक यांना त्यासाठी पाचारण करते..
(मनोगते अतिथींना विचारुन आधी किंवा नंतर ते ठरवू) 
रंगदेवतेला आणि रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन करुन रुद्रंग,निगडी,पुणे सहर्ष सादर करीत आहे- 
साठवणीतल्या आठवणी..! ( रमेश ) 
स्मिता : - 
दूर दूर असलो तरी 
जवळ घेऊन बसायचे  
एक पान सोनेरी त्या 
आठवणींचे जपायचे 
किती दिवस छान होते,घरीदारी लाड होते,ज्याच्यात्याच्या खांद्यावरती गोजिरवाणे लबाड होते..! 
उठता बसता हसता खेळता 'आई आई' करायचे,बाबा जर्रा चिडल्यावरती तिच्याच कुशीत शिरायचे..! 
अभ्यासाला बसता बसता हळुच पेंगत पडायचे,एक बुटुक चिंचेचे ते समोर कोण धरायचे?
कोण?काय?कुठे?कसे?-काहीच नाही कळायचे,दोन काळ्या डोळ्यांचे ते पाते लखलख हसायचे..! 
लहान मुलासारखे कां रे मोठ्ठेपणी रडायचे?- एकपान सोनेरी त्या आठवणींचे जपा

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७