श्री गुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 
|| श्री स्वामी समर्थ || 
------------------------------------------- 
अध्याय ७ वा 
गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा सांगणारी मित्रासह राजाची उद्बोधक कथा या अध्यायात आली आहे.शिकारीला गेलेला मित्रासह राजा एका भयानक दैत्याचा वध करतो.मृत्यूपूर्वी दैत्य आपल्या भावाला या कृत्याचा सूड घ्यायला सांगतो.दैत्याचा भाऊ मानवी रुप धारण करुन मित्रासहचा सेवेकरी होतो.पितृश्राध्दाच्या स्वयंपाकात मानवरुपातील दैत्य नरमांस शिजवून वाढतो.वसिष्ठ ऋषी ते पाहून संतापतात आणि त्याला १२ वर्षे राक्षस होशील असा शाप देतात.आपली काहीच चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला याचा सात्विक संताप येऊन मित्रासह वसिष्ठांना शाप देऊ लागतो.पण त्याची पत्नी त्याला त्यापासून परावृत्त करते पण शाप देण्यासाठी हातात घेतलेले पाणी राजाच्या पायावर पडते व त्याचा कल्मषपाद राक्षस होतो.समागम स्थितीतील जोडप्यातील पुरुषास मारुन तो त्यास खातो.त्याची पत्नी राजाला शाप देते.कल्मषपाद पुन्हा राजा होतो पण पत्नी बरोबर समागम करु शकत नाही.शाप मुक्त होण्यासाठी गौतमाच्या आदेशानुसार राजा गोकर्णास जातो व शाप मुक्त होतो. 
या कथेचा नीट विचार केला तर लक्षात येईल की दैनंदिन जीवनात बरेचवेळा माणूस शत्रूलाच मित्र समजून जवळ करतो आणि संकटांच्या,दु:खाच्या खाईत पडतो.या ठिकाणी धम्मपदातील पद आठवते." आपुल्या समान वा श्रेष्ठ आपुल्याहुनी..भेटला न मित्र तर एकटा‌ विहार कर..मूर्ख शत्रू जाण रे माणसा विचार कर..! " अध्यात्मिक साधना पथावर असा किंवा जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात असा प्रत्येक पाऊल सावधतेने टाकले तरच निभाव लागेल.मित्र जोडायचेच असतील तर गौतमासारखे जोडा हाच या अध्यायातील संदेश.पौराणिक कथांमध्ये राक्षस हे पात्र येते तेंव्हा राक्षस म्हणजे चित्ताला अयोग्य,अहीतकारक कृत्याकडे 
वळवणारा विचारांचा व्यापार समजावा.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 
*
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९६८००६५३

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७