श्री गुरु दत्त बोधामृत


|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
----------------------------------------
अध्याय ३ रा
अंबरीषाला दुर्वासमुनींनी दिलेला शाप भगवान विष्णू स्वत: भोगतात.दहा अवतार घेऊन‌ भूमी भार फेडतात ही कथा या अध्यायात आली आहे.मत्स्य,कूर्म,वराह,नरसिंह,वामन,परशूराम श्रीराम,कृष्ण,बुध्द आणि कल्की.हे दहा अवतार म्हणजे एकपेशीय जलचर सजीवां पासून पूर्ण मानव रुपा पर्यंत झालेला उत्क्रांतीचा,विकासाचा प्रवास जसा आहे तसा मनुष्याने इह-पर कल्याणासाठी प्रयत्नाने आपल्यातील सुप्त शक्तींचा शोध घेऊन त्यात  पूर्णत्व प्राप्त करावे असेही सांगणे आहे.बुध्द तत्वज्ञानात सांगितलेल्या दहा पारमितांचे दशावतारातील कार्याशी साधर्म्य दिसते.शील,दान,उपेक्षा,नैष्कर्म्य,वीर्य, शांती,सत्य,अधिष्ठान,करुणा आणि मैत्री या त्या पारमिता.श्रीकृष्णासारखे किंवा बुध्दाप्रमाणे पूर्ण पुरुष म्हणून स्वत:ला सिध्द करायचे असेल तर या पारमितांचा म्हणजेच सद्गुणांचा पूर्ण विकास घडवता आला पाहिजे.त्यासाठी अध्यात्मात यम,नियम, आसन,धारणा,आहार,प्रत्याहार,ध्यान व समाधी,साधण्याचे उद्दीष्ट साधकांपुढे ठेवले आहे.आता प्रत्येक माणूस काही अध्यात्मिक क्षेत्रात कठोर साधना करु शकेल असं नाही.सर्वांनीच परमहंस पद प्राप्त केले पाहिजे असा आग्रह धरणेही उचित होणार नाही.परंतू जीवनाची अनेक क्षेत्रे अशी आहेत ज्यात तो आपल्या अंगभूत क्षमता सिध्द करु शकेल आणि इह-पर कल्याण साधू शकेल.त्यात पूर्णत्व प्राप्त करु शकेल.आपल्या अत्यंतिक आवडीचे एखादे क्षेत्र निवडून त्यात कोणताही सामान्य मनुष्य प्रगती साधू शकतो.फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी हवी.अशी तयारी ठेवून आपल्या अंगभूत गुणांचा विकास घडवून आणणे ही देखील एक प्रकारची अध्यात्मिक साधनाच आहे.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७