श्री गुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
----------------------------------------
अध्याय ६ वा
या अध्यायात गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा सांगितला आहे.रावणाने आपल्या आईसाठी भगवान शंकराला प्रसन्न करुन घेतले आणि त्याचे आत्मलिंग मिळवले.आत्मलिंग म्हणजे उत्पत्ती,स्थिती व लय तत्वाची ची एकवटलेली शक्ती.देवलोकात हाहाकार माजला कारण
भोळ्या शंकराने ते रावणाला म्हणजे दानवांच्या राजाला दिले होते.दानव अशा शक्तीचा उपयोग विधायक कारणासाठी न करता विघातक कार्यासाठी करतील ही भिती होती.मग श्रीगणेशाने बटू वेषात जाऊन ते भूमीवर ठेवून देवलोकांना आश्वस्त केले. पुराणांमधे देव-दानवांच्या युध्द कथा पुष्कळ वाचायला मिळतात.या कथांचा मथितार्थ इतकाच की टोकाचा भौतिक विकास किंवा टोकाचा आत्मिक विकास दोन्ही मानवसमाजाच्या हीताचा नाही.भौतिक आणि अध्यात्मिक विकासाचा समतोल राखण्यासाठी ही युध्दे होती.आज २१ व्या शतकातही याच एका कारणासाठी संघर्ष पेटतोय,युध्दे सुरुच आहेत.जे पृथ्वीवरील सर्व समाजात चालू आहे तेच अध्यात्मिक साधना पथावर साधकाच्या मनातही चालू असते.सद्गुरु म्हणजेच सद्विवेकाचा दीप सतत तेवत असेल तर मार्ग सुकर होतो. जीवनाला योग्य दिशा सापडते.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
*
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९६८००६५३
Comments
Post a Comment