श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 
|| श्री स्वामी समर्थ || 
--------------------------------------- 
अध्याय १३ वा 
नृसिंहसरस्वतींचे सात शिष्य झाले.ते परत करंज्यास आपल्या घरी आले मातापित्यांना भेटले बहिण रत्नास उपदेश केला.मग पुन्हा भ्रमण करु लागले.गंगातटाकी स्नान करीत असताना एक विप्र पाठीला दगड बांधून आत्महत्या करायचा प्रयत्नात असल्याचे पाहतात.त्याला जवळ बोलावून विचारपूस करतात.पोटाच्या विकाराने मरणप्राय यातना भोगणाऱ्या या ब्राह्मणाला ते गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीकडून मिष्टान्नाचे भोजन देतात व व्याधीमुक्त करतात.बरेच वेळेला मनुष्याला जीवनात काहीही अर्थ नाही असे वाटू लागते.ना भोगात सुख,ना त्यागात आनंद.आपण कशासाठी जगतो आहोत हेच कळेनासे होते.अत्यंतिक निराशा येऊन तो जीवन संपवू पाहतो.एखादी व्याधी हे एक निमित्त असते.अशा वेळेला जगण्याला एखादा उदात्त हेतू दिला.जीवनावरील डळमळीत झालेला श्रध्देचा पाया दृढ व मजबूत केला की जगण्यात आनंद वाटू लागतो.सद्गुरुंनी या निराश झालेल्या ब्राह्मणात परिवर्तन कसे घडवून आणले त्याची कथा पुढील चौदाव्या अध्यायात वाचायला मिळते.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७