राख
राख
------
झाडांचे एकच गाणे
पक्ष्यांना ठाऊक नव्हते
चंद्राच्या पाझरणाऱ्या
किरणांनी लिहीले होते.. !
घनतृप्त निळे क्षण ओले
टपटपले गालावरती
हळूवार रंगरात्रींना
वेडावून टाकित होते..!
अंधार युगांची स्वप्ने
ती कुशीत घेऊन निजली
पलिकडे किनारा रडतो
कां तिला ठावकी नव्हते..!
मावळले गाणे तेंव्हा
घुसमटही वरती आली
ही किती अचानक माझ्या
आत्म्यावर राख पसरते..!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment