मेघ

मेघ
-----
निळा जांभळा मेघ अनावर
अलगद उतरुन वहात जातो
तुझ्या मनातिल मनात माझ्या
सहज पसरुनी अक्षय गाणे..
किनरा काळा स्वर खड्गासम
कापित जातो गूढ धुक्याला..
मुक्या कळ्यांचा जीव घाबरा
होवुन जातो शब्दशब्द
वाटेवर विस्तव..
हांक तुझ्यास्तव की माझ्यास्तव?
क्षितीज पालव..अनंत साठव.
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७