धूळ

धूळ
-----
हिर्वीगार
भरदुपार
कृष्णकमळ
मिटून घे..
हसू नकोस
पाण्यावरती
उठले तरंग
टिपून घे..
गुलबक्षीने
बक्ष दिले
तुला-मला
तिचे खूळ..
नवी भूल
नवी चूल
जन्मा भाळी
मरणधूळ..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७