अभंग

अभंग ५
---------
रखमाई विठ्ठल आवडली जोडी
म्हणोन ही गोडी लागलीसे
नाही कुणी संत आहे भाग्यवंत
वाचले सुचले बरळतो
विवेकाचे ओठी लावूनिया मन
संवाद साधतो आपणासी
छंदाने छंदाला वाढवित नेले
वाटले तुम्हाला कवी झालो
बरे आहे ते ते गुरुमाऊलीचे
उणे पदरात घालूनी जा
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७