दृष्टी

दृष्टी
-----
झाडून झाडोरा
वारा सैराटला
पाचोळा उडाला सर्वदूर..
अनेकात एक
एकही निमाला
शून्यी शून्य झाला शून्याहून..
अल्याड पल्याड
भेदही नुरला
दृष्टी स्थिरावली सृष्टीमधे..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे‌ पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७