पारवे
पारवे
------
तुझ्या डोळ्यातले पारवे
उडून गेले आणि-
मी ऐकले तुझ्या ओठावरचे
मोने गीत
तूच दिलेल्या जीवाचा कान करुन
(आता म्हणशील,"मी कधी दिला जीव तुला?)
पण-
ईच्छा-आकांक्षांना पालवी फुटून
आशा- स्वप्नांची वेल बहरु लागली
ती कां?
तृप्तीची फुलं डोलू लागली
अतृप्तीच्या देठावर-
ती कां?
वेदनेचं आकाश आहे
प्रत्येकाच्याच पाठीवर
प्रत्येकाचंच प्रेम आहे
चिमूटभर मातीवर..
उंबरा ओलांडण्यापूर्वी वळून
पहा एकदाच-
शतखंडीत झालेला माझा
प्रत्येक तुकडा तुझाच.
पारवे उडून गेले.छान.
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment