दुपार

दुपार
-------
चिंध्यात गुंडाळलेली
काळी ठीक्क दुपार
मी मागेच ठेवून चाललीय..
मी रात्र..
माझ्या पात्रात चांदणं ओसंडतय..
कधी तरी दिलं घेतलेलं आभाळ
तिच्या टच्च स्तनातून वाहून गेलं..
आणि निळे डोळे हसू लागले
काळ्या मातीच्या कुशीत-
तेंव्हा पासून,
भुकेशी असलेलं इमान इतकं घट्ट  
की पाप-पुण्य कळतच नाही
एखाद्याची वाट संपते,
पण यात्रा सरतच नाही..
यायला हवच कां रे करुणाकरा?-
पावलोपावली पेरलेली असताना
अशी तुझी तीर्थक्षेत्रे..

चिंध्यात गुंडाळलेली
काळीठीक्कं दुपार माझ्या
मागेच राहिलीय..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७