घार
घार
-----
डोळे टिपून ऊंच उडून
घार गेली आकाशी
बघते आहे कुठाय सावज?
केंव्हा पासून उपाशी..
केंव्हा पासून उपाशी
सारीपाट उधळला
भांडभांड भांडलो तरी
पुन्हा डाव सावरला..!
पुन्हा डाव सावरला तो
घाव देखील पचवला
काळोखाच्या नग्नतेला
दीपोत्सव दाखवला..
दीपोत्सव दाखवला तो
उभा जन्म वागवला
शृंगाराच्या मृयूवरचा
आदीअंत मावळला..
आदीअंत मावळला तो
अनंताचा प्रवासी
जनात असून झाला आहे
एकाकी वनवासी..
©रमेश रशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment