कळेना
कळेना
--------
मृत्यूच्या अनाघ्रात लावण्याला भुलून ती गेली ज्ञातापार..
आता कुणाचे अश्रू पुसणार आहेस?
आहेत शब्द?
सुख-दु:खाला अर्थ?
खरं म्हणजे
ती कधी आलीच नव्हती
येतही नाहीच.
ती होते फक्त प्रतिबिंबित
एकातून दुसऱ्यात दुसऱ्यातून
तिसऱ्यात तिसऱ्यातून चौथ्यात..
तिला पकडण्यासाठी धावणारे
असहाय्य विकल आपण..
कसली साथ?कसली संगत?
रक्तबंबाळ हात..
निळी जांभळी जांभई
तोंड मिटून मिटेना
जन्म सरुन..सरेना..
कळेना..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment