घट
घट
----
घट मातीचा फोडून टाक
फोडून टाक
आकाशाला जोडून टाक
जोडून टाक
दोन क्षणांची रंगत आणि दोन
क्षणांची संगत रे
रंगत संगत तू प्रीतीच्या विश्वासाने
बांधुन टाक
त्वचे खालती रक्तमांस अन् मज्जातंतू ना दुसरे
खाजखरुज ही ज्याची त्याला
अर्पून टाक
तो जगजेठी त्याच्या भेटी कुठे
कशा मी सांगू किती
लज्जा भीती सोड नागडी तहान
त्याला देऊन टाक
मुक्ती मुक्ती कसली मुक्ती मुक्ती
ही तर बंधन एक
भक्तीसाठी जन्म मिळाला जन्मच
अवघा वाहून टाक
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
२१/७/२००७
Comments
Post a Comment