सती जाणारा प्रत्येक शब्द
सती जाणारा प्रत्येक शब्द
-------------------------------
सती जाणारा प्रत्येक शब्द
डायरीत लिहून ठेवतो
भर दुपारी मनुष्यत्वाचे मुडदे
पाडणारा अनर्थ ढवळून घेतो
संज्ञेच्या मनोज्ञ मद्यात..
घेतो स्वत:चीच राख थापून डोळ्यांवर..
अनंत दु:खांच्या सावलीत होरपळताना..
तीच असते माझे एकमेव सांत्वन
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाच्या
चांदण्याच झाल्या असत्या
तर
तर
कशाला कुणी पाहिले असते
आपले प्रतिबिंब कवितेत?..
कविते,
ही आणखी काही छिन्नभिन्न
गर्भाशयं..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
(पिवळा चाफा हिरवे पान मधून)
Comments
Post a Comment