विरे तिथे उरे
विरे तिथे उरे
---------------
दिगंताच्या झाडा मागे उभा आहे कोणी
खांद्यावर काठी त्याच्या ओठावर गाणी..
गाण्या आधी बासरीचे सूर वेडावती..
वेडातच अनवाणी पाय पुढे जाती..
नदी वाहे शांत तसे मन वाहे शांत..
शांत शांत किनाऱ्याचा लागो नेदी अंत..
अंतकाळ ज्याचा त्याचा कवळीती संत
देहाविण भोगतो हा देह भगवंत..
काठी फिरे आसम़ंत गोल गोल फिरे..
शोधायास खूण शब्द..विरे तिथे उरे..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
Comments
Post a Comment