अभंग
अभंग ७
----------
प्रक्षाळुनी पाय गुरु माऊलीचे
सेविता म्या तीर्थ धन्य झालो
जन्मासवे आले जे जे कर्मभोग
भोगून अभोक्ता मुक्त झालो
आता परमार्थ साधीतो सहज
सहजची प्रेमा तुझा ल्यालो
कृपेचा प्रसादू सर्वत्रे भरला
तो मज पावला आनंदलो
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
Comments
Post a Comment